पुर्णाहुती विधीने श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळ्याची सांगता

परदेशी पर्यटकांचीही सोहळ्यास उपस्थिती

चौके ( प्रतिनिधी ) : २ फेब्रुवारी ते ४ फेब्रूवारी असा तीन दिवस चालणाऱ्या श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार , कलशारोहण सोहळा आणि श्री गणेश व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापना सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी हवन , पुर्णाहुती सोहळ्याने झाली. प. पू. स्वामी विपाप्मानंद यांच्या उपस्थितीत यजमान जोडपे अक्षय अनिल प्रभु,अवनी अक्षय प्रभु यांच्या हस्ते स्थापित देवता पूजन, अभिषेक हवन, पुर्णाहुती विधी करण्यात आला त्यानंतर महाआरती करण्यात आली यात सर्व गावकरी, मानकरी ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले होते.


दुपारनंतर श्री देव रवळनाथ लिंगेश्वर ट्रस्टच्या वतीने विजय वसंत प्रभु यांच्या हस्ते श्री देवी माऊली जीर्णोद्धार समिती अध्यक्ष अनिल प्रभु , उपाध्यक्ष प्रकाश प्रभु , सचिव विजया परब , खजिनदार गणेश प्रभु , सहसचिव संदीप माडये , सहखजिनदार श्रीधर प्रभु , संपर्क प्रमुख उमेश प्रभु , प्रमुख सल्लागार मंगलदास प्रभु , सिताराम परब , दाजी परब आणि अनंत परब या सर्वांचा माऊली जीर्णोद्धारामध्ये दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री देवी माऊली जीर्णोद्धार निधी संकलन समितीच्या वतीने गावातील १०० वर्षे वय पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देउन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये वयाची १०६ वर्षे पूर्ण करणाऱ्या केशव भिसाजी परब यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या पुरोहित आणि व्यक्तींचा जीर्णोद्धार समितीच्या वतीनेही यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कलशारोहण सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जीर्णोद्धार समितीच्या सचिव विजया परब यांनी आभार मानले.
मान्यवर आणि परदेशी पर्यटकांचीही दिली माऊली मंदिर सोहळ्यास उपस्थिती सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त तसेच आता रेरा च्या सचिवपदी कार्यरत असलेले श्री वसंत प्रभु यांच्या सौभाग्यवती माधुरी वसंत प्रभु यांनी सोहळ्यास उपस्थित राहून माऊली मातेचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुरू असलेला मंत्रोच्चार ऐकून मालवण येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या लंडन येथील पर्यटक किम आणि त्यांच्या सोबत पंजाब येथील प्रिया यांनी याठिकाणी थांबुन देवी माऊलीचे दर्शन घेतले आणि इथल्या धार्मिक संस्कृतीचे कौतुक केले. यावेळी जीर्णोद्धार समितीच्या सचिव विजया परब यांनी किम आणि प्रिया यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!