दहावीतील मुलाचा कालव्यात पडून मृत्यू

फोंडाघाट मधील शिरवलकर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

कणकवली (प्रतिनिधी) : उदय राजेश शिरवलकर (१६, फोंडाघाट-साईनगर) या शाळकरी युवकाचा साईनगर येथे देवघर पाटबंधारे पाण्यात तोल जावून झाला. कालव्यातील चिखलामुळे तो रूतल्याने बाहेर पडूशकला नाही. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वा.च्या सुमारास घडली.

उदय हा फोंडाघाट हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. ४ वा. च्या सुमारास वडील गुरे आणण्यासाठी जात असल्याचे पाहून त्यांना थांबवत आपण जातो, असे सांगितले आणि तो गेला होता. त्याच्या सोबत आणखी एक मित्र होता साईनगर येथील पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यात तोल जावून तो पडला. जरी वाहते पाणी नसले तरी पावसाचे पाणी साठले होते आणि खाली गाळ असल्यामुळे तो चिखलात रुतला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

उदय शिरवलकर याच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील व एक लहान बहिण आहे. त्याच्या अपघाती निधनाने फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती मिळताच फोंडाघाट पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार श्री. वंजारे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

error: Content is protected !!