खारेपाटण केंद्र शाळेत घेण्यात आलेल्या राखी बनविणे स्पर्धेचा निकाल जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राखी बनविणे स्पर्धा केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकला नुकताच शाळेच्या वतीने जाहीर करण्यात आला. खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत एकदिवसीय “राखी बनविणे कार्यशाळा”शालेय विद्यार्थी करीता घेऊन राखी बनविणे स्पर्धा -२०२३ नुकतीच घेण्यात आली होती.यामध्ये शाळेच्या ईयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर व आकर्षक विविध रंगाच्या राख्या बनविल्या होत्या. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या सर्व राख्या शाळेत प्रदर्शन करून मांडण्यात आल्या होत्या. तर या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे….
इयत्ता १ ली – प्रथम – कु.काव्या कासार,द्वितीय – स्वयम हर्षल पोरे,तृतीय – कु.राधिका करांडे,
इयत्ता २ री – प्रथम – कु.क्रिशिका गुरव,द्वितीय – गुलाम मोहम्मद सारंग, तृतीय – चिंतामणी तरनेळकर
इयत्ता – ३ री – प्रथम – रूद्र देवेद्र घंदाडे,द्वितीय – अर्जुन संकेत शेट्ये, तृतीय – राज सचिन शेट्ये
इयत्ता – ४ थी – प्रथम – मानस उमेश गुरव,द्वितीय – बळीराम जाधव, तृतीय – कु.काव्या गायकवाड
इयत्ता – ५ वी – प्रथम – गौरांग बाबरदेसाई,द्वितीय – सार्थक हर्षल पोरे,तृतीय – मंथन स्वप्नील गुरव,
इयत्ता – ६ वी – प्रथम – कु. आराध्या प्रकाश निग्रे,द्वितीय – कु. इरम नझीर मुकादम,तृतीय – कु. मनस्वी संतोष जुवाटकर
इयत्ता – ७ वी – प्रथम – रूद्र मनोज साटविलकर,द्वितीय – कु.तन्वी उपाध्ये,तृतीय – कु.समृध्दी सचिन भालेकर
या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी,उपाध्यक्ष मंगेश तेली, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, गौरी शिंदे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!