पुनाळ वकल समाज उन्नती मंडळ भिरवंडे व विजय रामचंद्र सावंत यांच्या सौजन्याने कणकवली रेल्वे स्थानक येथे व्हील चेअर प्रदान

वृध्द,अपंग यांची होणार मोठी सोय

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले स्थानक. विविध प्रकारच्या प्रवाशांची इथे सदैव वर्दळ. मात्र वृद्ध प्रवासी ,अपंग यांना रेल्वे स्टेशनवर असलेल्या एकमेव व्हीलचेअर चा आधार होता. एखादवेळी एकाच रेल्वेसाठी वृद्ध, अपंग यांची जास्त संख्या असल्यास मोठी गैरसोय व्हायची. आणि नेमकी हीच अडचण ओळखून माणुसकीच्या नात्याने भिरवंडे गावातील पुनाळ वकल समाज उन्नती मंडळ भिरवंडे या संस्थेने व कै .रामचंद्र सावंत( बाबाजी पटेल) यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री विजय रामचंद्र सावंत यांच्या वतीने दोन व्हीलचेअर कणकवली स्टेशन मास्तर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

माणुसकीच्या नात्याने सदर व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या वतीने आभार मानण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश सावंत , सल्लागार श्री विजय सावंत , कायदेविषयक सल्लागार ॲड.मिलिंद सावंत,सदस्य सर्वश्री रामकृष्ण सावंत ,संतोष सावंत, अनाजी सावंत,मंगेश सावंत तसेच रेल्वे स्थानकातील कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!