कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते संदेश पारकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आग्रे यांच्या फोंडाघाट येथील ओम पाचोबा या निवासस्थानी जात पारकर यांनी वाढदिवसाचा केक भरवत राजकारणा पलीकडची आपली मैत्री जपली. यावेळी संदेश पटेल, उबाठा शिवसेनेचे राजू रावराणे, वैभव मालंडकर, शांताराम रावराणे आदी उपस्थित होते.
शिवसेना उबाठा नेते संदेश पारकरांनी संजय आग्रे ना दिल्या वाढदिनी शुभेच्छा












