अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शिक्षकांप्रती कृतज्ञता
वैभववाडी (प्रतिनिधी) : आज ५ सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाज यशस्वीपणे पार पाडले. प्राचार्य म्हणून चैतन्या पाटील, पियूष जाधव, तर शिक्षक म्हणून सानिका रावराणे, वैष्णवी हावळ,ओम गोरे,अन्वी गोसावी,दुर्वा शेलार,परी नेवरेकर,सिद्धेश भंडारी, अजित बर्गे, शिवानी फुटक,वेदिका रावराणे, सादिका वनकर,रतन रावराणे, वैष्णवी चव्हाण,निशांत चव्हाण,रेखा सुतार, निशा सय्यद,प्रथमा मोहिते,कस्तुरी पाटील,हर्षदा गुडेकर,मानस जामदार, सलमा शेख, सतेज केळकर, मुस्कान काझी, पियुष जाधव,अर्सिन काझी, मुस्कान काझी,आदिती साळुंखे, ब्रिजेश तुळसणकर, ध्रुवी साळुंखे,आर्यन क्षिरसागर,प्रिती पाटकर शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून यश सय्यद,रुद्र ढेकणे, कार्तिक सुतार,देवांग महाडिक यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली. शिवाय शिक्षकदिनी शिक्षकांची भुमिका पार पाडताना आलेले अनुभव देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. प्रथम सत्रात तासिका व द्वितीय सत्रात कृतज्ञता समारंभ अशा दोन सत्रांत कार्यक्रमाचे नियोजन एस. बी.शिंदे यांनी केले होते. या कार्यक्रम प्रसंगी गुरुची महती सांगणारी कविता शिक्षक एस.टी.तुळसणकर यांनी सादर केली. तर अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शिक्षकच आपल्याला दाखवतो असे मत माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. जीवनातील गुरुचे स्थान किती अटळ आहे याबाबत मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.एस.नादकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन सतेज केळकर याने केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील., सांस्कृतिक प्रमुख पी.बी. पवार, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी शिक्षक तसेच सर्व इयत्तेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













