फाेंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२६ चा निकाल सलग १६ व्या वर्षी १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम क्रमांक कु. तन्वी भिमराव प्रभावळकर (४११) ६८.५०%, द्वितीय क्रमांक कु. रुद्रा ओमप्रकाश रासम (३७०) ६१.६७% व तृतीय क्रमांक कु. सेजल सुहास रासम (३६८) ६१.३३% मिळवत उत्तीर्ण झाले.
कै. नामदेवराव मराठे यांनी २००९ मध्ये स्थापन केलेल्या या विद्यालयाचा निकाल सातत्याने १००% लागत असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष मा.श्री. दिपेश नामदेव मराठे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य श्री. जयराज राऊळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
प्रथम क्रमांक
द्वितीय क्रमांक
तृतीय क्रमांक
कु. तन्वी भिमराव प्रभावळकर
(४११) ६८.५०%
कु. रुद्रा ओमप्रकाश रासम (३७०) ६१.६७%
कु. सेजल सुहास रासम (३६८) ६१.३३%












