रितेश सुतार यांची सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती सदस्यपदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर वैभववाडी तालुक्यातून लोरे गावचे सुपुत्र रितेश सुतार यांची निवड जाहीर झाली आहे. वैभववाडी तालुक्यातून समितीवर सदस्य होण्याचा पहिला मान रितेश सुतार यांना मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी नुकतीच नव्याने ही समिती गठित केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रत्येक तालुक्यातून एक सदस्य या समितीवर निवडण्यात आला आहे. जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी देखील या समितीत नियुक्त करण्यात आले आहेत.

रितेश सुतार हे लोरे गावचे सुपूत्र आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी भजन व दशावतार नाटकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. वैभववाडी तालुक्यात त्यांची उत्तम भजनी बुवा अशी ओळख आहे. तसेच नाटकामध्ये हार्मोनियम वादक म्हणूनही उत्कृष्ट काम करत आहेत. लोरे ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी संचालक. भाजप शक्ती केंद्र प्रमुख. सिंधुदुर्ग जिल्हा सुतार समाज जिल्हा उपाध्यक्ष. आणि नवतरुण भजन नाट्य मंडळ लोरे नं.2 सुतारवाडी तालूका वैभववाडी या मंडळाचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. आमदार नितेश राणे यांचा निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. निवडीनंतर आमदार नितेश राणे यांच्याकडून श्री.सुतार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. बुवा रितेश यांच्या रुपाने कलाकारांना मार्गदर्शक असणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची या समितीवर निवड झाल्याची प्रतिक्रिया तालुक्यातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीनंतर वैभववाडी तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!