अखेर उड्डाणपुलाखालील ते दुकान हटवले

नगरपंचायत प्रशासनाची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी): गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात उड्डाणपुलाखाली फळ भाजी विक्रेते आणि पार्किंग व्यतिरीक्त कुठलेही दुकान मांडू नये या नगरपंचायत प्रशासनाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत थाटलेले मखर सजावटी च्या दुकानावर अखेर नगरपंचायत ने कारवाई करत ते दुकान हटवले. या दुकानाबाबत नगरपंचायत डोळेझाक करत असल्याचा आरोप करत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उड्डाणपुलाखाली मांडल्यास चालेल काय ? असा थेट सवाल माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी नगरपंचायत प्रशासनाला विचारला होता. अखेर नगरपंचायत प्रशासनाने याची दखल घेत ते दुकान हटवले.नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, रवींद्र म्हडेश्वर, संतोष राणे आदींनी त्या दुकानदाराला समज देत दुकान हटविण्यास सांगितले. त्यानंतर व्यापाऱ्याने ते दुकान हटविले.

error: Content is protected !!