उड्डाणपुलाखालील भाजी फळ फुल विक्रेत्यांना दुकान थाटण्यासाठी नियम लागू

सर्व्हिस रोड रेलिंग पासून 4 फूट आत दुकाने ; अन्यथा होणार कारवाई

कणकवली (प्राथनिधी): गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पटवर्धन चौकातील हायवे उड्डाणपुलाखालील भाजी फळ आणि फुल विक्रेत्यांना दुकाने थाटण्यासाठी आजपासून नियम लागू करण्यात आले आहेत. सर्व्हिस रोड च्या रेलिंग पासून 4 फूट आतमध्ये प्रत्येकाने आपले दुकान लावायचे आहे.नगरपंचायत प्रशासनाने याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली असून स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, रवींद्र म्हडेश्वर, संतोष राणे आदींनी मार्किंग करून देत दुकानदारांना समज दिली आहे. यामुळे गणेशचतुर्थी काळात सर्व्हिस रोड वर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.ग्राहक खरेदीसाठी उड्डाणपुलाखाली जाऊन खरेदी करू शकतील. याआधी दुकानदार थेट सर्व्हिस रोड रेलिंग ला लगत आपली दुकाने लावत होते.त्यामुळे ग्राहक रस्त्यावर उभे राहून खरेदी करत, साहजिकच यामुळे वाहतूक कोंडी होत होती. आता सर्व्हिस रोड रेलिंग च्या 4 फूट आत दुकाने लावण्यासाठी सुरुवात करण्यात आली असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

error: Content is protected !!