शिक्षणमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख आग्रेंच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : मनसे सिंधुदुर्ग विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांनी आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज रात्री साडेआठ वाजता शिवसेनेचा भगवा हाती घेतला. निलेश मेस्त्री यांच्यासह भरत भालेकर, सिद्धेश मोंडकर, विजय धोपटे, दर्वेश परब, तुकाराम कारेकर या मनसैनिकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद कणकवली विधानसभा मतदारसंघात आणखी वाढली असून सिंधुदुर्गात आधीच जर्जर झालेल्या मनसे संघटनेला हा हादरा आहे.