कनेडी प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी तसेच पर्यवेक्षक बयाजी बुराण यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला या शिक्षक दिनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शालेय समितीचे चेअरमन आर.एच. सावंत तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते, भारतीय इतिहासात त्यांच्या महान कार्य बद्दल त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ते एक शिक्षक, तत्त्वज्ञ, दूरदर्शी, आणि समाज सुधारक होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला, हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो

या शिक्षक दिनाच्या औचित्याने प्रशालेत शिक्षक दिन विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी शिक्षक म्हणून साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षक होण्याचा अनुभव घेतला, आयुष्यामध्ये शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मांडली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एन.मसुरकर सर (सहा. शिक्षक माध्यमिक) तर आभार बी.डी. कोरडे (सहा. शिक्षक उच्च माध्यमिक) यांनी केले

error: Content is protected !!