घोणसरी आरोग्यदूत पदी मिलिंद मराठे यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): घोणसरी गावच्या आरोग्यदूत पदी मिलिंद मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.घोणसरी गावची ग्रामसभा सरपंच मॅक्सि पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आरोग्य सेवक राठोड यांनी आरोग्यदूत निवडीचा विषय सभेत मांडला. त्यावेळी सोसायटी चेअरमन गणेश परब यांनी मिलिंद मराठे यांचे नाव आरोग्यदूत पदासाठी सुचविले.त्यानंतर सर्वानुमते मिलिंद मराठे यांची आरोग्यदूत पदी निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच कारेकर, ग्रामसेवक सिद्धेश गोसावी, सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!