कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच सुधिर सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तरंदळे ग्रामपंचायत ची ग्रामसभा आज सरपंच सुशिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी भालचंद्र रावले ( देवा) यांची निवड करण्यात आली. या निवड़ी नंतर सरपंच यांनी मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.जसे मावळते अध्यक्ष सन्माननीय जयसिंग नाईक यांनी दर्जेदार काम केलं तसच नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यातून काम घडेल.अशी आशावाद व्यक्त केली
तसेच या पुर्वीचे तंटामुक्ति अध्यक्ष जयसिंग नाईक यांनी याआधी चांगले काम केले त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच नुतन अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, माजी तंटामुक्ति अध्यक्ष जयसिंग नाईक तसेच गावस्तरिय कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.













