फोंडाघाट चेकपोस्टवर पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी घेतले ताब्यात
कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट चेक पोस्ट येथे कार्यरत असताना अल्पवयीन युवतीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करणारे तीन संशयित आरोपी एका वाहनातून पळत असल्याचा असल्याची खबर मिळाल्यानुसार त्या वाहनातील तिघांना फोंडाघाट चेक पोस्ट येथे ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नितीन शांताराम बनसोडे यांनी ही कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे एका गुन्ह्यातील संशयितांचा पळून जाण्यापासूनचा प्लान फसला असून त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री बनसोडे यांना आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी सदर वाहन फोंडाघाट चेक पोस्ट दिशेने आल्याची माहिती दिली. त्यानंतर श्री. बनसोडे यांनी सदर वाहनाला थांबून त्यातील तीन संशयितांची चौकशी केली असता सय्यद यांनी सांगितलेले संशयित सह आरोपी असल्याची त्यांची खात्री पटल्यावर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. व आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या ताब्यात देण्यात आले. नितीन बनसोडे यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस दलातून कौतुक केले जात आहे.












