तरंदळे येथील शाळांना शिक्षकांच्या व मुलांच्या मागणी नुसार विविध भेटवस्तू प्रदान
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे सरपंच सुशिल विजय कदम यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून तरंदळे ग्रामपंचायत वतीने शिक्षकांच्या व मुलांच्या मागणी नुसार शाळा तरंदळे नंबर 1 येथे प्रिंटर प्लस झेरॉक्स मशीन देण्यात आली.तरंदळे शाळा नंबर 2 येथे स्मार्ट टीव्ही संच देण्यात आला. शाळा तरंदळे नंबर 3 येथे ऑफिस कपाट देण्यात आले.तरंदळे शाळा नंबर 4 येथे ऑफिस कपाट देण्यात आले.
ह्यावेळी शालेय साहित्य देताना सरपंच सुशिल कदम म्हणाले की ग्रामपंचायत कडून तुम्हाला साहित्य पुरविण्यात आलेले आहे .त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.यापुढेही ग्रामपंचायत स्तरावर जेवढे शैक्षणिक कामासाठी प्रयत्न केले जातील तेवढे प्रयत्न आपण प्रामाणिक पणे करणार असा विश्वास दिला. ह्यावेळी सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य.सुनील दत्त जाधव,माजी सरपंच .सुधीर सावंत,माजी उपसरपंच संदेश सावंत,शाळा नंबर 1 पोकळे सर,डोईफोडे सर, तळदेवकर सर,कांबळी सर,शाळा नंबर 2 लोकरे मॅडम,अंगणवाडी सेविका पावसकर मॅडम,संजय परब,शाळा नंबर 3 तांबे सर,अनिल खरात,शाळा नंबर 4 तांबे मॅडम, व ग्रामस्थ,शाळेतील मुले उपस्थित होते.
















