ऐन पावसाळ्यात देवगड तालुक्याच्या नळयोजना बंद ; आ.नितेश राणेंनी ओरोस ला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलावली तातडीची बैठक

देवगड (प्रतिनिधी): ऐन पावसाळ्यामध्ये देवगड व विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची गणेशोत्सवामध्ये होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आमदार नितेशजी राणे साहेब यानी रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीस संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यानीही उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!