हुंबरट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम ; विधवा महिलांसाठी हळदीकुंकू

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हुंबरठ ग्रामपंचायत च्या वतीने गावातील विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करत अभिनव उपक्रम राबवित विधवा महिलांचा सन्मान केला. या ग्रामपंचायतच्या विधवा असलेल्या सरपंच मनीषा मनोहर गुरव यांच्या कडून एका सुहासिनीला हळदी कुंकू वाहून वान देण्यात आले.

यावेळी हुंबरट सरपंच मनीषा मनोहर गुरव, ग्रामसेवक वैभव वसंत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या रिया राजेंद्र पांचाळ, शरिफा सईद काझी, प्रेरणा भिकाजी दळवी, सुचिता सुहास दळवी, आरोग्य सेविका योगिता गोसावी, तलाठी योजना सापळे, माजी सरपंच अर्चना वायंगणकर तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गुरव, सुनील गुरव, समीर होळकर हे उपस्थित होते.

error: Content is protected !!