आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांचेवर घणाघात
उबाठा सेना,संजय राऊत हे चीन आणि पाकिस्तानचे एजंट, देशद्रोहाचे गुन्हा दाखल करा
सर्वांचे समाधान होईल असे आरक्षण महायुती सरकार देईल
कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंग्याच्या टोळीतील सदस्य आहेत, त्यामुळे जळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा त्यांना अधिकार नाही. कोणत्या तोंडाने तुम्ही शिवरायांच्या पुतळ्याला हात लावणार आहात ? असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी देशाचे गद्दार आहेत.अशी टीका केली. पाकिस्तान आणि चीनची भाषा बोलणारे हे उबाठा चे लोक जळगाव मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे सुद्धा अनावरण करू शकत नाहीत. वल्लभभाई पटेल हे देश प्रेमी होते. तुम्ही तर पाकिस्तान आणि चीनचे एजंट आहात.वल्लभभाई च्या पुतळ्याला कोणत्या तोंडाने तुम्ही हात लावणार ? आमचे छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि तेच हिंदवी स्वराज्य आता तुम्ही औरंग्याच्या टोळीचे सदस्य होऊन संपवू पाहत आहात. त्यामुळे जळगांव येथील छत्रपती शिवराय आणि सरदार वल्लभ भाई पटेल स्मारकाच्या पाचशे मीटर अंतरावर सुद्धा जाण्याचा तुम्हाला अधिकार राहिलेला नाही अशी घनाघाती टीका भाजपचे प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. दुसऱ्याच्या कामाचे बारसे करण्याची सवयच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीला लागलेली आहे. त्यांच्या घरचे काम बंद झाले म्हणून दुसऱ्याच्या घरात काय चाललंय याकडे त्यांचे लक्ष लागू आहे. जो माणूस राज्याचा मुख्यमंत्री राहिला त्याला प्रशासन काय असते. शासकीय प्रोटोकॉल काय असतो हे माहीत नाही. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते अनावरण केले जावे अशा पद्धतीची शासकीय परिपत्रके असताना उद्धव ठाकरे यांनी शेंबड्या मुलासारखे त्यांचे अनावरण करू नये असेही आमदार नितेश राणे म्हणाले.
राज्यातील सर्वात मोठा दरोडेखोर, खिचडी चोर आणि खांबाट्यातील कामगारांना देशोधडी लावणारा असे सगळे चोर जळगावत एकत्र येत आहेत आणि बेकायदेशीर रित्या उद्घाटने करत आहेत अशी टीकाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली. G २० समेट मीटिंग साठी आमेरिका आणि तर १९ देशांचे राष्ट्रपती,पंतप्रधान भारतात आलेले आहेत,यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश जगभरात कोणत्या उंचीवर नेऊन ठेवला आहे हे स्पष्ट होते. मात्र असे असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उबाठा सेना ही चीन आणि पाकिस्तानचे एजंट असल्यामुळेच अशी भाषा बोलत आहेत. राहुल गांधी युरोप मध्ये जावून चीनचे गोडवे गातात, पाकिस्तानचे गोडवे गातात तीच भाषा संजय राऊत सामनातून बोलतात अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्या मुखपत्रांवर बंदी आणली पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.
जळगावच्या जरंगे- पाटील आणि मराठा समाज यांच्या मागण्या योग्य पद्धतीने महायुतीचे सरकार पूर्ण करेल.ओबीसी समाजातील काही नेत्यांची मागणी आहे. त्याचाही विचार करेल. कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
केसरी फांसावडे येथे होणारे फिश पार्क पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहत आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला राज्य आणि देशपातळीवर नावलौकिक मिळवून देणारे हे फिश पार्क असेल असा विश्वासही यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सी वल्ड प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उबाठा सेनेच्या लोकांनी विरोध केला आणि त्यातूनच पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फार मोठे नुकसान उद्धव ठाकरेंच्या सेनेने केलेले आहे. याची आठवण यावेळी आमदार नितेश राणे यांनी करून दिली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी वडेट्टीवार यांनी कोणत्या भाषेत मराठा समाजाचा अपमान केला त्याची व्हिडिओ सिरीज मी देऊ शकतो.सारथी संस्थेचे नुकसान कसे केले हे मी सांगू शकतो. असेही एका प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार यांना सुनावले.