आजी-आजोबांना वैशाली पंडित लिखित कल्याण कटोरा पुस्तक ठाकूर गुरुजीन कडून भेट
आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणची आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत तथा कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान, स्मारक मालगुंड (रत्नागिरी) सहल आज आयोजित केली आहे. आज 10 सप्टेंबर हा आजी-आजोबा दिवस याचेच औचित्य साधत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या वतीने कोमसापचे आजी-आजोबा अशोक कांबळी, सुरेंद्र सकपाळ, शिवराज सावंत, देवयांनी आजगांवकर, वैजयंती करंदीकर, सदानंद कांबळी, नारायण धुरी, रामचंद्र वालावलकर या आजी आजोबा यांना कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर(गुरुजी) यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प तसेच श्रृती गोगटे यांच्या वतीने लेखिका वैशाली पंडित लिखित “कल्याण कटोरा” पुस्तक भेट देत साजरा करण्यात आला. यावेळी बहुसंख्य कोमसाप सदस्य उपस्थित होते.