खारेपाटण परिसरात मध्ये बिबट्याचा वावर

पाळीव कुत्रे,मांजर व कोंबड्या भक्ष्य स्थानी

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वनाधिकाऱ्यांनी दिली खारेपाटणला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पासून जवळच असलेल्या चिंचवली,नडगिवे यांसह खारेपाटण भागात सद्या बिबट्या या वन्य प्रण्याचा वावर वाढला असून येथील नागरिकांचे तथा शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे,मांजरे व कोबड्या त्याने आपल्या भक्ष्यस्थानी केले असून यामुळे नागरिकांमध्ये सद्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

याबाबत नुकतेच खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी संबधित वन अधिकारी यांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. शनिवारी वन विभागाच्या वतीने फोंडा येथील वनपाल डी आर कुळेकर व कसार्डे वनरक्षक अतुल खोत यांनी खारेपाटणला तातडीची भेट दिली. यावेळी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,महेश बांधिवडेकर, ऋषिकेश राऊत आदी उपस्थित होते.

खारेपाटण परिसरात गेली १५ दिवस या बिबट्याचा वावर असून आजपर्यंत अनेकांचे पाळीव कुत्रे,मांजरे तसेच कोंबड्या देखील त्यांनी भक्ष केल्या असून मनुष्य वस्तीपर्यंत आलेल्या या बिबट्या मुळे शाळेत जाणारी लहान मुले,महीला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना धोका निर्माण झाले असल्याचे यावेळी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी वनाधिकारी यांना सांगितले.तर खारेपाटण येथे ट्रंपिंग करून पिंजरा लावण्यात यावा.व या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.अशी देखील मागणी यावेळी राऊत यांनी केली.

दरम्यान खारेपाटण परिसरात बिबट्या बरोबरच अन्य वन्य प्राण्यांचा देखील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून माकडे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या केळीची तसेच अन्य फुल फळे झाडांची नुकसान करत असून डुकरे देखील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.या सर्व घटनांचा विचार करता वनविभागाच्या वतीने कार्यवाही होणे गरजेचे आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी याबाबत चर्चा करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात येईल.तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना पंचनामा करून नुकसानीची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देण्यात येईल.तरी येथील नागरिकांनी वन्य प्राणी जीवापासून काळजी घ्यावी.असे आवाहन वनपाल डी आर कुळेक्रर यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!