कणकवली (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये ग्रामीण विभागातून कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 ग्रा पं ची निवड केंद्रियस्तर स्पर्धेसाठी झाली आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोरे नं 1 ग्रामपंचायतचे सरपंच अजय तुळशीदास रावराणे याना आज ओरोस येथील शरद कृषी भवन मध्ये जिल्हास्तर स्पर्धेत पात्र ठरल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लोरे नं 1 ग्रामपंचायत ची निवड स्वच्छ सर्वेक्षण 2023 ग्रामीण मध्ये झाली असून अलीकडेच केंद्रीय समिती ने लोरे ग्रा पं ला भेट देत गावातील आरोग्य, स्वच्छतेविषयी आढावा घेतला होता.लोरे नं 1 गावच्या ग्रामस्थांच्या एकजुटीने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, गावातील जेष्ठ मार्गदर्शक, महिला भगिनी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे केंद्रस्तरीय स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी लोरे गाव पात्र ठरला आहे. स्वच्छतेचा घेतलेला वसा जोपासून सर्व लोरेवासीय असेच सातत्य ठेवतील असा विश्वास सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव , ग्रामसेवक ऋतुराज कदम यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023 जिल्हास्तर स्पर्धेचे प्रमाणपत्र मध्ये लोरे नं 1 ग्रा पं सरपंच अजय रावराणेंना प्रदान












