कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त महसूल मंडळ अधिकारी नामदेव जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज भाजपा जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर केली. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर जिल्हा कोषाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळलेल्या नामदेव जाधव यांना आता थेट अनुसुचित जाती मोर्चा च्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे विद्यमान जिल्हा कोषाध्यक्ष असलेले नामदेव जाधव हे सामाजिक उपक्रमांत नेहमी सक्रिय असतात. आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांना अभिप्रेत पक्षसंघटन कार्य करून पक्षसंघटना वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
नामदेव जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड










