कणकवली (प्रतिनिधी) : सर्प इंडिया ( SARRP) सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबीर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले. यावेळी शिबिराला अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, माजी जि.प सदस्य श्री. नागेश मोरये , माजी प.स सदस्या हर्षदा वाळके, नांदगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री राजू तांबे,कोळोशी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, स्वस्तिक फाऊंडेशनचे संदेश शेटये आदींनी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष श्री. अमोल भोगले, सह सचिव सचिन जाधव,सदस्य मयूर राणे, सर्प इंडियाचे मंदार राणे, सुदेश पाटील,राजेश भोगले, विठ्ठल बिडये, रिद्धेश तेली, सत्यवान चव्हाण, सर्प मित्र भाई मोरये, अक्षय म्हसकर, अक्षय निकम, महेश तळेकर, राजेश डामरे, सावंतवाडी रक्तपेढी चे डॉक्टर व सर्व कर्मचारी, नांदगाव उपकेंद्राचे कर्मचारी व रक्तदाते उपस्थित होते. शिबिरात 25 रक्तदाते यांनी रक्तदान केल. या शिबिरा साठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तपसे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्प इंडिया ही संस्था देशभर वन्यजीव संवर्धन व रक्षणाचे महत्वाचे काम करत असून या सोबत या विषयची जनजागृती ग्रामीण भागात करत आहे.













