हिर्लोक येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्योजक बाळा सावंत व तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

कुडाळ (प्रतिनिधी) : आज दिनांक ६ जानेवारी रोजी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जाहिर पक्ष प्रवेश घेण्यात आला. गावातील ग्रामस्थ व महिला अशा शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर आदी उपस्थित होते.

अश्विनी परब, प्राची परब, सौरवी चव्हाण, सारिका निचम, सायली बोभाटे, रिया कांबळी, सायली जाधव, सुलोचना परब, मयुरी परब, आयुषी परब, रामचंद्र परब, प्रमोद जाधव, किरण कानडे, प्रशांत राणे, रावजी नाईक, महेश राणे, संजय निचम, संतोष परब, महादेव चव्हाण आदी शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. बाळा सावंत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षाचे वरिष्ठ नेते माजी खाजदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केल्याचे सांगितले.

मामाच्या गावचे सर्वेसर्वा बाळा सावंत यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी रांगनेकर मॅडम, गडकरी, अगरवाल मॅडम, जयदीप तुळसकर, अनिरुद्ध गावडे, करलकर उपस्थित होते.

error: Content is protected !!