आणि आजी आजोबांच्या डोळ्यात तरंगले आनंदाश्रू..

जि.प.शाळा आशिये येथे आजी आजोबा दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : जि.प.शाळा आशिये येथे आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना शाळेच्या गेटपासून लेझीम नृत्याच्या सहाय्याने वाजत गाजत हॉलमध्ये आणण्यात आले. यावेळी त्यांची वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली. नातवांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन केले. यावेळी विद्यार्थी आणि आजी आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले होते. पाद्यपूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांना गोड खाऊ खायला दिला, आजी आजोबांनी सुद्धा मोठ्या मनाने आपल्या या नातं नातींना भरभरून आशीर्वाद दिले. यानंतर सर्व आजी-आजोबांना व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आले.

आजी आजोबा दिनाविषयी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस विठोबा गुरव,तसेच शिक्षकांनी आजी आजोबा दिना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि या कार्यक्रमावेळी उपस्थित शाळा समिती अध्यक्षा सौ.निधी पुजारे यांनीही आजी आजोबा दिना च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक सौ.सावंत, सौ.मसुरकर,सौ.मोरे, श्री.कदम सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नेहा मोरे यांनी केले तर आभार कदमसर यांनी मानले.

error: Content is protected !!