कै.सुधीर सावंत यांचा स्मृतिदिन रक्तदान सह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावचे युवा कार्यकर्ते कै सुधीर सावंत यांचा दहावा स्मृतिदिन विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला सकाळी भाजप नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व रक्तदात्यांना आकर्षक जॅकेट भेट देण्यात आली.

भिरवंडे ग्रामपंचायत येथे जेष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप करण्यात आले यावेळी श्रीमती सुजाता सावंत माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, सौ संजना सावंत पत्रकार विनय सावंत माजी चेअरमन संतोष सावंत गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे उपसरपंच राजेंद्र सावंत, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत मिलिंद बोभाटे श्रीकांत सावंत विजय सावंत अशोक सावंत आदी उपस्थित होते यावेळी राजेंद्र सावंत व मोहन सावंत यांनीं कै सुधीर सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला तर संदेश सावंत यांनी आपले बंधू कै सुधीर सावंत यांचा स्मृतिदिन गेली दहा वर्षे विविध सामाजिक कार्यक्रमानी साजरा करीत असून यापुढेही गावातील ग्रामस्थ साठी मदतीचा हात देईन असे सांगितले प्रास्ताविक व आभार विनय सावंत यांनी मानले गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कनेडी हायस्कूल येथे गुणवंत विध्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपये ची कायम ठेव
माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे अकरावी बारावी सायन्स च्या गुणवंत विध्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपये ची कायम ठेव च्या रकमेचा धनादेश शालेय समिती चे चेअरमन आर एच सावंत व मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्याकडे कै सुधीर सावंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता सावंत यांच्या हस्ते सुपूर्त केला यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, सौ संजना सावंत चेअरमन आर एच सावंत मुख्याध्यापक सुमंत दळवी पर्यवेक्षक बयाजी बुराण व सांगवे सरपंच संजय सावंत माजी सरपंच विजय भोगटे माजी चेअरमन संतोष सावंत पत्रकार विनय सावंत आदी उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना आर एच सावंत यांनी या शाळेचे माजी विध्यार्थी कै सुधीर सावंत यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतिदिनी शाळेला दिलेल्या देणगी बद्धल कृतन्हता व्यक्त केली तर संदेश सावंत यांनी आपले जेष्ठ बंधू कै सुधीर सावंत व आपण या शाळेचे माजी विध्यार्थी असून ज्या शाळेत आपण शिकलो त्याचे काहीतरी देणे लागतो याच भावनेने आपण मदत केली असून यापुढेही या शाळेसाठी भरीव अशी मदत करणार असल्याचे सांगितले तसेच शाळेच्या वतीने संदेश सावंत यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्धल शालेय समिती चेअरमन आर एच सावंत व मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!