पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा विशेष प्रयत्न
आचरा (प्रतिनिधी) : क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नाम.रविंद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना चालना देण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा/शिक्षण संस्थानासुमारे 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे क्रीडा साहित्य किट मंजूर केले होते. याचे वितरण आज जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूल येथे भाजप नेते मंगेश बाळा गांवकर यांच्या हस्ते शाळा कमिटी अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर व विद्यार्थ्यांना करण्यात आले.
क्रीडांगण विकास अनुदान योजना सन 2022-23 अंतर्गत मालवण मधील नोंदणीकृत 10 संस्थाना हा लाभ मिळाला आहे.
यावेळी मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर यांनी पालकमंत्र्याच्या संकल्पनेतून विविध खेळाच्या साहित्यासाठी व मुलांच्या क्रिडा गुणानां चालना देण्यासाठी आभार मानले. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव अरविंद घाडी यांनी मानले. यावेळी त्रिंबक माजी सरपंच विलास(राजु) त्रिंबककर, विवेक(राजु)परब, विवेक जाधव, क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग, धुरे, संतोष मेस्री, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.












