खारेपाटण जिल्हा बँकेत घडेलेल्या चोरी प्रकरणातील चोरटे कणकवली चोरी प्रकरणातील असल्याची माहिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा – खारेपाटण च्या कार्यालयात आज बुधवारी दुपारी १२.३० ते १२.४५ दरम्यान एका ग्राहकाकडील रोख रक्कम लंपास करून पळालेले अज्ञात दोन्ही चोरटे हे कणकवलीत घडलेल्या चोरी प्रकरणातील चोरटे असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपली तपास यंत्रणा हलविली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

दरम्यान खारेपाटण येथे जिल्हा बँकेत घडलेल्या चोरीच्या घटनेतील चोरटे हे जिल्ह्याबाहेर जावू नये म्हणून पोलिसांनी जिल्हा लगत असलेल्या रत्नागिरी,सिंधुदुर्ग व गोवा राज्याच्या सीमेवर कडक वाहन तपासणीचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.तसेच संशयित दोन्ही चोरटे हे खारेपाटण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सि सी टी वी फुटेज मध्ये दिसून आले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली असून त्याअनुशांगाने पोलिसांनी आपला पुढील तपास सद्या सुरू ठेवला आहे.

error: Content is protected !!