कणकवली (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा.यावेळी आजी-आजोबांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात आजी आजोबांची काळजी घ्या, प्रेम करा. त्यांचे ऋण कधीच विसरु नका असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.तसेच विद्याधर देसाई यांनी मनोगतातुन गोष्ट सांगुन सर्व नातवंडांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडीत मानेसर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ.शिरोडकर यांनी मानले.












