कणकवली शहर परिसरात सीएनजी गॅस सेंटर उपलब्ध करावे

आमदार नितेश राणेंकडे कणकवली तालुका रिक्षा संघटनेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका रिक्षा संघटनेच्या वतीने कणकवली परिसरात सीएनजी सेवा उपलब्ध करण्यासाठी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या सभासदांनी पत्राद्वारे आ.नितेश राणे यांच्याकडे आपली कैफियत मांडली.

कणकवली शहर व या तालुक्यात असंख्य लोक रिक्षा व्यवसाय करत आहेत. पेट्रोलचा दर वाढल्या कारणाने बहुतांश व्यावसायिकांच्या रिक्षा या सीएनजी वर चालणाऱ्या आहेत. मात्र कणकवली तालुक्यातील रिक्षाव्यवसायिकांना ओरोस व फोंडाघाट येथील सीएनजी पंप स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. आणि या दोन्ही सीएनजी पंप स्टेशनवर कधीच पुरेसा सीएनजी उपलब्ध नसतो. काही वेळा बारा बारा तास अधिक वेळ रांगेत राहूनही सीएनजी उपलब्ध होत नाही. अनेक रिक्षा व्यावसायिकांनी कर्ज काढून रिक्षा घेतलेले आहेत. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाची गुजरात होते. मात्र सीएनजी साठी अनेक तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. पुरेसा सीएनजी न मिळाल्या कारणाने त्यांना रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागतो. आणि याचा फटका त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबालाही सोसावा लागतो. या पत्राद्वारे कणकवली तालुका रिक्षा संघटनेने ओराेस व फोंडाघाट येथे पुरेसा सीएनजी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. किंवा कणकवली परिसरात नव्याने सीएनजी पंप स्टेशन उभारण्यात यावे. आणि आम्हा रिक्षाव्यवसायिकांना व आमच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा. अशी नम्र विनंती कणकवली तालुका रिक्षा संघटनेने आमदार नितेश राणे यांना केली.

error: Content is protected !!