श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री माऊली क्लिनिकल लॅब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : पंधरावा वित्त आयोगातून ग्रामपंचायत माईन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीर व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणास गावातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे तर दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी कौशलवृद्धी प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले होते. गावातील अनेक महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली या आरोग्य शिबिरामध्ये सर्व महिलांचे रक्तातील अनेक तपासण्या, ब्लड प्रेशर व इतर रुटीन चेकअप करण्यात आले तर कौशल्यवृद्धी प्रशिक्षणामध्ये गावातील महिलांना निळ फिनोल, लिक्विड सोप, कपड्यांची डिटर्जंट पावडर, आईस केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व झालेल्या तपासण्यांचे रिपोर्ट लाभार्थ्यांना पोच करण्यात आले तर प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच नीतीशा पाडावे, ग्रामसेवक वर्षा जाधव, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, ग्रामपंचायत सदस्य अमोल घाडीगावकर, वैभवी तांबे, शाश्वती राणे, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री नवलराज काळे, प्रशिक्षक स्नेहा कामत, सौ संजना कोंडविलकर, सागर घाडीगावकर, प्रशांत आडेळकर, जयराम गावकर, सुरज घाडीगावकर, गणेश गावकर, राजदीप पवार, शायरी दहिबावकर, विद्या आचरेकर सुरज घाडीगावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












