वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वर्धा येथे शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेला आपल्या धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैला बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ आयोजित बैलपोळा उत्सवाला भाजपा नेते आमदार श्री. नितेश राणे साहेब यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळा आमदार मश्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,कार्यक्रमाचे आयोजक वर्धा सेल चे आमदार डॉ. पंकज भोयर, उत्सव समिती, पदाधिकारी व वर्धेकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
















