सावंतवाडी (प्रतिनिधी) : सेंट्रल इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक विष्णु माणगांवकर यांना महाराष्ट्र कलारत्न गौरव सन्मान पुरस्काराने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे सन्मानित करण्यात आले.
कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला नाट्य उत्सव 2023 साठी प्रगल्भ अनुभुती पूर्ततीच्या कृतार्थतिची ऐतिहासिक नोंद ठरणाऱ्या निवडक अश्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देवून समाजाभिमुख कार्य करून इतिहास रचणार्या व्यक्ति व संस्थेच्या गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान म्हणुन विष्णु गंगाराम माणगावकर झाराप तालुका कुडाळ सिंधुदुर्ग यांना सुप्रसिद्ध अभिनेते स्वराज्य रक्षक संभाजी महाराज फेम कलाकार अनिल गवस व गोवा राज्य कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सध्या विष्णु माणगावकर हे महालक्ष्मी कला अकादमी झाराप संस्थापक अध्यक्ष तसेच सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी प्रशालेचे कलाशिक्षक विष्णू माणगावकर यांचे अभिनंदन केले आहे.