शनिवार आठवडा बाजार फुल
ग्रामपंचायत व पोलीस प्रशसानाच्या मदतीने गर्दीवर नियत्रंण
खारेपाटण (प्रतिनिधी): गणेश चतृथी सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेत वाढणारी ग्रहकांची व नागरिकांची तसेच खाजगी वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस, आरोग्य,व्यापारी,विद्युत विभाग,रिक्षा संघटना व स्थानिक संस्था यांची नियोजनाची तातडीची मीटिंग शुक्रवारी संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे,किरण कर्ले,जयदीप देसाई, मनाली होनाळे, शितिजा धुमाळे,अमिषा गुरव,खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस पराग मोहिते,खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष्य सुहास राऊत,पोलीस पाटील दिगंबर भालेकर रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष बब्या खांडेकर,शिवाजी राऊत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रजाल कुबल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज शनिवार खारेपाटण आठवडा बाजार असल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी व्हायला सुरवात झाली होती.खाजगी वाहनांची संख्या वाढत होती. खारेपाटण पोलीस व ग्रामपंचायत यांच्या वतीने बँरेकेट लावून वाहतुकीचे नियोजन करण्यात असेल.याकामी खारेपाटण पोलीस दुरर्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे, होमगार्ड गोपाळ लोके,उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे, किरण कर्ले,जयदीप देसाई यांनी सहकार्य केले. या सभेत गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या खाजगी वाहने योग्य रीतीने पार्क मध्ये लावणे व फक्त दुचाकी वाहनाना बाजारपेठेत प्रवेश देणे स्थानिक व्यापारी तसेच फिरते व्यापारी यांनी रस्त्यावर दुकाने न लावणे तसेच रिक्षा संघटनेने ग्रामपंचातीला वाहतूक नियोजन बाबत सहकार्य करणे,बाजारपेठेत एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलीस प्रशासणाला सहकार्य करणे. आदी विषयवार चर्चा करण्यात आली होती.












