अनेक दिवस बंद असलेल्या स्टेट बँक एटीएम मुळे ऐन गणेशोत्सवात ग्राहकांची गैरसोय

आर्थिक व्यवहारासाठी बॅंकेत ग्राहकांची गर्दी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात गेली कित्येक दिवस स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम सेवा बंद अवस्थेत आहे. ऐन गणेशोत्सवात वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांनी खरेदीसाठी बाजारपेठ भरुन गेलेली आहे मात्र शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम सेवा बंद अवस्थेत असल्याने स्टेट बँक शाखेच्या ग्राहकांना याचा फटाका बसला आहे. परिणामी बॅंकेत आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे.

error: Content is protected !!