आशिये ग्रामपंचायत च्या वतीने साहित्यिक, लेखक विलास खानोलकर यांचा विशेष सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : आशिये गावच्या दृष्टीने आजचा दिवस अभिमानाचा आहे. दशावतार गोविंद हरिशचंद्राचो या नाटकाचे सादरीकरण होत आहे. त्या नाटकाचे लिखाण गेल्या 15 वर्षापूर्वी आपल्या विलास खानोलकर यांनी केले होते. या स्क्रिप्टला पुणे , मुंबई एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिके मिळालीत तसेच मामा वरेरकर पुरस्कार या एकांकिला मिळाला आहे. नाट्यरसिकांच्या मागणी खातर ज्येष्ठ दिग्दर्शक सुहास वरुणकर यांनी या नाटकाचे सोन केलं आहे. गेले अनेक साहित्य आणि नाट्य क्षेत्रात किंवा अभिनय आशिये गावचे नाव लौकिक केले. त्यांचा आशिये गावच्या वतीने सत्कार व्हावा अशी आमची इच्छा होती. तो आज योग जुळुन आला आहे. त्यामुळे या आशिये गावच्या लालमातीत साहित्यिक , लेखक विलास खानोलकर यांच्या रुपाने हिरा जन्मला असल्याचे प्रतिपादक आशिये सरपंच महेश गुरव यांनी केले.
श्री दत्तक्षेत्र आशिये मठ पुरातन दत्त मंदिर येथे गुरुप्रतिपदा उत्सव 2023 व दत्तमंदिर नुतन वास्तुच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दशावतार गोविंद हरिशचंद्राचो या नाट्यप्रयोगाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने आशिये गावचे सुपुत्र , या नाटकाचे लेखक विलास खानोलकर यांच्या विशेष सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, श्री. लाड सर, नाटकाचे दिग्दर्शक सुहास वरुणकर व महाराष्ट्र परिवहन महामंडळ कणकवली , सिंधुदुर्ग विभाग आम्ही लालपरी निर्मित नाट्यप्रयोगाचे सर्व कलाकार उपस्थित होते.
लेखक विलास खानोलकर म्हणाले, माझे खुप कौतुक आपण सर्वांनी केलात. हे नाटक गेली १४ वर्षे कपाटात पडलेलं होत. कोणाला देण्याची इच्छा नव्हती कारण ते मनासारख उभ राहत नव्हत. मात्र दिग्दर्शंक सुहास वरुणकर यांनी मेहनत घेवून हा नाट्यप्रयोग चांगला करत आहेत. त्याच्या बद्द्ल मला समाधान आहे. माझा जो सत्कार झाला त्याचे श्रेय सुहास वरुणकर यांचे आहे. मला काव्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले अनेक शाली खांद्यावर पडल्या होत्या पण आज गावात ग्रामपंचायतच्या वतीने जो झालेला माझा सन्मान म्हणजे आईच्या हातचं पिठल भात खाल्ल्यासारख वाटल.
दिग्दर्शंक सुहास वरुणकर म्हणाले , दशावतार गोविंद हरिशचंद्राचो या नाटकाचे लेखन सहींता अतिशय सुंदर विलास खानोलकर यांनी केलेलं आहे. त्यातुन आम्ही नाट्यकृती उभारत न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची रंगीत तालिम बघीतल्यानंतरच त्यांनी प्रयोग करण्याची परवानगी दिली. सर्वच ठिकाणी या नाटकाला सर्वच ठिकाणी पारितोषिके मिळाली आहेत. ती केवळ आमच्या कणकवली एसटी आगारातील कर्मचा-यांमुळेच आहेत.
गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त आयोजित या नाट्यप्रयोगाला मोठया प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होती. दि. 5 फेब्रुवारी च्या दिवशी सकाळपासून 10 ते सायं 5 वा. आशिये गावामध्ये भिक्षा फेरी करण्यात आली. व दि. 06 फेब्रुवारी च्या दिवशी सकाळी 6.30 ते 7 वा. नित्यपूजा व पवमान अभिषेक , सकाळी.7 ते दुपारी. 1 वा. सग्रह रुद्र स्वाहाकार , दुपारी 1 वा. आरती व मंत्रपुष्पांजली , दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद आणि भजनबुवा – उदय राणे राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ , जाणवली, सायंकाळी 7 ते 7,30 वा. धुपारती असे कार्यक्रम उत्साहात पार पडले.













