तळेरे(प्रतिनिधी) : श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे तळगाव हितवर्धक संघ, मुंबईचे पदाधिकारी, सभासद, स्थानिक ग्रामस्थ व नोकरी, व्यवसायानिमित्त ईतर शहरात स्थिर झालेले आणि गणेशोत्सवासाठी गावी आलेले तळगाववासी, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, शालेय समिती सदस्य यांचा स्नेहमेळावा मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष .आनंद दळवी, सचिव अनिल दळवी सल्लागारलहू राणे व जी. आर. दळवी, सहसचिव गोविंद ऊर्फ राजा दळवी, जनार्दन ऊर्फ अमोल दळवी, सर्व कार्यकारी समिति सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शैलजा शिरोडकर, शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि विद्यमान सल्लागार प्रदीप शिंदे सर, शालेय समिती सदस्य,गावच्या प्रथम नागरिक सरपंच कु.लता खोत तसेच गावातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यातील पदाधिकारी, माजी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक ग्रामस्थ तसेच गणेशोत्सव सणासाठी गावात आलेले चाकरमानी ईत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेतर्फे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार्या सर्व शिष्यवृत्ती देणगीदार यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या स्नेहमेळाव्या मध्ये तळगाव हितवर्धक संघ मुंबई ने संघाचे चे संस्थापक आणि कित्येक वर्ष ज्यांनी संघाचे अध्यक्षपद भूषविले, कित्येक सामाजिक कार्यात ज्यानी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली त्या कै.एल.डी.दळवी यांना मरणोत्तर ‘तळगाव रत्न भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचा स्विकार कै.एल.डी.दळवी यांचे चिरंजीव प्रकाश ऊर्फ पापा दळवी यांनी केला. प्रकाश दळवी यांनी या सन्माना साठी संस्थेचे तसेच कै.एल.डी.दळवी यांच्या समाजकार्यात ज्यांनी ज्यानी त्यांना सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले आणि उपस्थितांपुढे जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि रूपरेषा संस्थेचे सहसचिव गोविंद ऊर्फ राजा दळवी यांनी आखली तर या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर मॅडम यांनी सहकारी शिक्षक, कर्मचारी आणि शालेय समिती सदस्य यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षण पंडित माने सर यांनी केले यामध्ये त्यांना जेष्ठ शिक्षिका सावंत मॅडम आणि शिक्षक जैतापकर सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सहसचिव जनार्दन ऊर्फ अमोल दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.











