वैभववाडीत शिंगुदेवी युवा मंडळ बांधवाडी, आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आलेल्या २५ तरुण युवकांनी रक्तदान करत घालून दिला एक आदर्श

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बांधवाडी येथे शिंगुदेवी युवा मंडळ यांच्या वतीने आज रोजी २१ सप्टेंबर २०२३ कोकिसरे गाव बांधवाडी होळीचा मांड येथे मुंबई युवा तरूण मंडळींनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आलेल्या मुंबईतील २५ तरुण मुलांनी यावेळी रक्तदान केले त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावातील शिंगुदेवी युवा मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व एस एस पी एम पडवे बल्ड बँक यांनी त्यांच्या या रक्तदान शिबीरातील सहभागामुळे आभार मानले. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी गणेशभक्तांना रक्ताअभावी येणाऱ्या संकटाचे विघ्न दुर करण्यासाठी गणेश मंडळांना रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासंबंधी जिल्हा वासियांना आवाहन केले होते त्यास प्रतिसाद देत शिंगुदेवी युवा मंडळ बांधवाडी, वैभववाडी यांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

error: Content is protected !!