फसवणूक प्रकरणी बिल्डर सिद्धांत परबचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची टांगती तलवार ..अटक टाळण्यासाठी घ्यावी लागणार हायकोर्टात धाव

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : फ्लॅट विक्री करताना फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी शहरातील बिल्डर सिद्धांत परब याचा अटकपूर्व जामीन आज प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळून लावला.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी सरकार पक्षाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केला.त्यामुळे आरोपी सिद्धांत परब याच्यावर अटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत.बिल्डर सिद्धांत परब याच्या विरोधात फ्लॅट विक्री करताना ग्राहकाची फसवणुम केल्याचा गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी बिल्डर सिद्धांत परब याने अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी जोरदार युक्तिवाद केला. तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी सिद्धांत परब याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

error: Content is protected !!