अखिलेश फाळके विरुद्ध विश्वनाथ गुरव यांच्यात रंगणार डबलबारी सामना
कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या निवासस्थानी मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यात श्री. पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवलीचे बुवा कु. अखिलेश फाळके व श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ परेल मुंबईचे बुवा दुर्वास विश्वनाथ गुरव यांच्यात हा डबलबारी सामना होणार आहे. कुमार फाळके यांना पखवाज साथ रोहित मोंडे यांची असून तबला साथ दीपक समजिस्कर यांची आहे. तर श्री गुरव यांना पखवाज साथ नितीन घाडी व तबला साथ तुषार शिंदे यांची आहे. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री उपरकर यांनी केले आहे.