आचरा (प्रतिनिधी): एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना(बाळू) देसाई, किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत, ओरोस महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे, किशोर नरे, संजय लाड, उपसरपंच सुभाष बांबुळकर, शुभम परब, प्रणिल कावले, अजय घाडीगावकर आदी उपस्थित होते.