जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सई धुरी यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माता व बाल संगोपन अिधकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सई रूपेश धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सई धुरी यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासन अप्पर सचिव व. पां. गायकवाड यांनी काढले आहेत. रिक्त असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता.

error: Content is protected !!