पवारांनी थुंकलेली सुपारी म्हणजे उबाठा सेना

राजकारणातील शक्ती कपूर म्हणजे संजय राऊत

कणकवली प्रतिनिधी): पवारांनी थुंकलेली सुपारी म्हणजे उबाठा शिवसेना झाली असल्याची जोरदार टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. अर्बन नक्षल चा प्रवक्ता संजय राऊत झाला आहे काय ? अर्बन नक्षल आणि संजय राजाराम राऊत मध्ये साम्य आहे. जे गुण अर्बन नक्षल मध्ये असतात तेच संजय राऊत मध्ये आहेत. संजय राऊत आणि अर्बन नक्षल मध्ये संबंध आहेत काय ? याचा तपास केंद्र सरकारने करावा ही मागणी करणार असल्याचेही आमदार नितेश राणे म्हणाले. सामना हे काँग्रेसचे मुखपत्र झाले आहे. काँग्रेसवर टीका केली की संजय राऊतला झोंबते. आदित्य ठाकरेच्या ट्विट मुळे साधी माशीसुद्धा मरत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती बघून आपला विदेशी दौरा रद्द केला. जेव्हा तुमचा मालक उद्धव ठाकरे मानेच्या ऑपरेशन साठी जसलोक मध्ये ऍडमिट असताना त्यांचा मुलगा आदित्य परदेश दौरा करत होता. वडील आजारी असताना आदित्य स्वता मुख्यमंत्री कसा होऊ शकतो याचा प्रस्ताव आपल्या आईच्या माध्यमातून मविआ कडे देत होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंची 17 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असतानाही आदित्य परदेश दौऱ्यात व्यस्त होता.असा करंटा नातू कोणालाही मिळू नये अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. येत्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुती शासनात मंत्री होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपात फूट पडण्याची स्वप्ने पाहू नयेत. महिला आरक्षणाचा त्रास सर्वात जास्त संजय राऊतला होणार. राज्याच्या राजकारणात शक्ती कपूरची भूमिका करत संजय राऊत महिलांचे शोषण करतो. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर संजय राऊत सारखे शक्ती कपूर जेलमध्ये जाणार हे ठरलेले आहे.त्यामुळे महिला आरक्षणाचा राऊत ला जाच होणे साहजिक आहे. पंकजाताईंचे वक्तव्य मी ऐकले नसल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत 75 कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकास साठी प्राप्त होतायत. महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर, राम मंदिरला ज्याप्रमाणे पर्यटकांची मांदियाळी असते. त्याचधर्तीवर कोकणकाशी कुणकेश्वर मंदिरचा पर्यटन विकास होणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पाऊल उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगड मध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे प्रकल्प पर्यटन च्या माध्यमातून आणणार आहे असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!