ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ

शेतकऱ्यांना दुभार पेरणी करून उत्पन्न वाढविण्यास लागणार हातभार

तळेरे (स्वप्निल तांबे) : कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ अखेर आज करण्यात आला. जवळपास तीन किलोमीटर पर्यंत या पाईपलाईनचा आराखडा आखण्यात आला असून येणाऱ्या तीन महिन्यात काम पूर्ण करणार असल्याचे कॉन्ट्रॅक्टर महेश रावराणे यांनी प्रसंगी बोलताना सांगितले.

ओझरम तलाव नवीन पाईप लाईनचे भुमीपुजन समारंभ जिल्हा कार्यकारी अभियंता सूर्य मंगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी उप कार्यकारी अभियंता पाटिल श्री पावणाई पाणी वाटप संस्था अध्यक्ष विजय राणे, कॉन्ट्रास्टर महेश रावराणे, सरपंच समृद्धि राणे, उप सरपंच प्रशांत राणे, माझी सभापती विनायक राणे, पोलिस पाटिल तुषार तांबे, सामाजिक कार्यकर्त अशोक राणे आदि ओझरम गावातील शेतकरी आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ओझरम तलावापासून पाईप लाईन झाल्यावर जवच्या वाड्यांना मुबलक पाणी पुरवठा होऊन शेतीसाठी फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना दुभार पेरणी करून उत्पन्न वाढविण्यास हातभार लागणार आहे.

error: Content is protected !!