खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झालेल्या निमित्ताने विश्व हिदू परिषद व बजरंग दल कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे आज सायंकाळी खारेपाटण वरचे स्टँड येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर किल्ले खारेपाटण संवर्धन समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी खारेपाटण किल्ले संवर्धन समितीचे कार्यवाह मंगेश गुरव,ऋषिकेश जाधव यांसह खारेपाटण मधील ग्रामस्थ सुधीर कुबल,चंदू शिंदे,राजन गाठे,विजय ब्रम्हदंडे,प्रमोद मोहीरे,चिन्मय गुरव आदी उपस्थित होते. यावेळी शिवशौर्य यात्रेतील सजवलेल्या रथातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खारेपाटण किल्ले संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी खारेपाटण मधील असंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.














