आमदार वैभव नाईक यांनी यावर्षी १ हजार पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे घेतले दर्शन

 कणकवली (प्रतिनधी)  : दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात. गणेशोत्सवातील ११  दिवसांत ते सर्वसामान्य नागरिकांच्या  घरगुती गणपतींचे  दर्शन घेतात. यावर्षी देखील कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन १ हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतींचे दर्शन घेतले. दरम्यान यावेळी अनेक नागरिक गणपती दर्शनासाठी त्यांना आग्रह करत असतात  मात्र वेळेअभावी सर्वच ठिकाणी  जाणे शकय नसते परंतु जास्तीत जास्त ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या उत्साहात सहभागी होऊन नागरिकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न  आ. वैभव नाईक यांचा असतो. नागरिकही त्यांचे उत्साहात स्वागत करतात.

error: Content is protected !!