15 लाखांचा गुटखा जप्त ; कणकवली पोलिसांची मोठी कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : मडगाव हुन मुंबईच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडला. कणकवली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग मधील अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई आज सोमवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास जानवली येथे हॉटेल नीलमकंट्री साईड जवळ करण्यात आली. यामध्ये आयशर ट्रक क्रमांक mh 07 ax 0305 या टेम्पो सह चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले. या टेम्पो मध्ये विमल तंबाखू व गुटखा ची 32 पोती मिळून 15 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आयशर टेम्पो ची किंमत 8 लाख मिळून 23 लाख 15 हजाराचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतला. कणकवली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार तसेच भादवी कलम 328 नुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. दरम्यान ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, बापू खरात, संतोष शिंदे प्रदीप दबडे, चालक भूषण सुतार आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!