दिलीप वर्णे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रांतिक सदस्यपदी निवड

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): दिलीप वर्णे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रांतिक सदस्यपदी वर्णी लागली असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे वर्णे यांना प्रांतिक सदस्यपदी नियुक्ति पत्र मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे प्रदान केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, कुडाळ महिला तालुका अध्यक्ष पूजा पेडणेकर, देवगड़ तालुका अध्यक्ष रशीद खान, कुडाळ तालुका अध्यक्ष आर, के. सावंत जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, वैभववाड़ी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, मनोहर साटम, ओ बी सी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा प्रतिनिधि केदार खोत आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!