आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चे संपादक राजन चव्हाण यांचे चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वाढदिनी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चे संपादक राजन चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष , सांस्कृतिक कलाकार महानंदा चव्हाण यांनी मानाचा फेटा बांधून तुतारीची सलामी देत राजन चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सर्व विधायक कार्यक्रमांची सुयोग्य प्रसिद्धी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल च्या माध्यमातून संपादक राजन चव्हाण नेहमीच करत असतात. उन्नती मंडळाच्या सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देऊन मंडळाला कायम सहकार्य करतात अशा शब्दांत जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लवेंद्र किंजवडेकर, चंद्रकांत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, मंगेश साळसकर, विजय जाधव, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!